पाच दिवस पावसाचं धुमशान!; उद्या लई कोसळणार!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, २२ जुलैपासून पुढील ५ दिवस सार्वत्रिक आणि संततधार पाऊस पडणार आहे. पावसाची प्रतीक्षा असलेल्या घाटाखालील भागातही दमदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविला आहे. जिल्ह्यात आता सार्वत्रिक पावसाला सुरुवात झाली आहे. सध्याचे वतावरण हे पावसासाठी पोषक असल्याने सर्वदूर जोरदार सरी बरसणार आहेत. जिल्ह्यात घाटावरच्या सहा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, २२ जुलैपासून पुढील ५ दिवस सार्वत्रिक आणि संततधार पाऊस पडणार आहे. पावसाची प्रतीक्षा असलेल्या घाटाखालील भागातही दमदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविला आहे.

जिल्ह्यात आता सार्वत्रिक पावसाला सुरुवात झाली आहे. सध्याचे वतावरण हे पावसासाठी पोषक असल्याने सर्वदूर जोरदार सरी बरसणार आहेत. जिल्ह्यात घाटावरच्या सहा तालुक्यांत आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला असला तरी घाटाखालील खामगाव वगळता इतरत्र अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. या सार्वत्रिक पावसामुळे बळीराजा निश्चितच सुखावणार आहे.

उद्या जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ
जिल्ह्यात उद्या २३ जुलै रोजी काही भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २० ते २५ जुलै या काळात जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस बरसणार असला तरी २३ जुलै रोजी काही भागांत अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो.

– मनिष येदुलवार, कृषी हवामान केंद्र, बुलडाणा