नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण सुरू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सातव्या वेतन आयोगाच्या थकीत रकमेपैकी पहिल्या व दुसऱ्या हफ्त्याची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी बुलडाणा नगरपरिषदेच्या नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज, २३ ऑगस्टपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. शासनाने नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी रकमेपैकी पहिल्या व दुसऱ्या हफ्त्याची रक्कम देण्याचे …
 
नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण सुरू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सातव्या वेतन आयोगाच्या थकीत रकमेपैकी पहिल्या व दुसऱ्या हफ्त्याची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी बुलडाणा नगरपरिषदेच्या नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज, २३ ऑगस्टपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.

शासनाने नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी रकमेपैकी पहिल्या व दुसऱ्या हफ्त्याची रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र बुलडाणा नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ती रक्कम देण्यात आलीच नाही. त्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊन कार्यवाही न झाल्याने व समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आजपासून साखळी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार उपोषणाला सुरुवात केली आहे.