धोडपनगरीत विठ्ठल- रखुमाई मूर्तीची प्रतिष्ठापना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील धोडप येथील नागरिकांनी वर्गणी करून भव्यदिव्य विठ्ठल रखुमाई मंदिराची उभारणी केली. मूर्ती प्रतिष्ठापणा व कळस उभारणी प. पू. श्री हरीचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली.मंदिराच्या कळस उभारणीसाठी गावातील लेकीबाळींनी देणगी व भेट वस्तू दिल्या. यावेळी कळसाची शोभायात्रा, यज्ञ, महाप्रसाद व स्वामींजींचे प्रवचन झाले. यावेळी आमदार श्वेताताई महाले …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील धोडप येथील नागरिकांनी वर्गणी करून भव्यदिव्य विठ्ठल रखुमाई मंदिराची उभारणी केली. मूर्ती प्रतिष्ठापणा व कळस उभारणी प. पू. श्री हरीचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली.
मंदिराच्या कळस उभारणीसाठी गावातील लेकीबाळींनी देणगी व भेट वस्तू दिल्या. यावेळी कळसाची शोभायात्रा, यज्ञ, महाप्रसाद व स्वामींजींचे प्रवचन झाले. यावेळी आमदार श्वेताताई महाले यांचे वडील अंकुशराव पाटील, अंकुश तायडे,विरेंद्र वानखेडे, कृष्णकुमार सपकाळ, केशव पालवे आदींनी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.