धर्मादाय संस्थांनी पूरग्रस्तांसाठी पुढे यावे..!; सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे खूप मोठी जिवीत हानी व नुकसान झालेले आहे. महापूर, दरड कोसळल्यामुळे राज्यात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, गरीब व कष्टकरी, मजूर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी, त्यांना जिवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधोपचार आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक स्वरूपात मदत करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे खूप मोठी जिवीत हानी व नुकसान झालेले आहे. महापूर, दरड कोसळल्यामुळे राज्यात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, गरीब व कष्टकरी, मजूर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी, त्यांना जिवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधोपचार आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक स्वरूपात मदत करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत शासन त्यांच्‍या परीने आवश्यक त्या सर्व उपाय योजना करीत आहेच. मात्र सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून, स्थापन झालेल्या धर्मादाय संस्था यांनीही या कामी पुढाकार घेणे गरजेचे आहे. जेणेकरून गरजूंना शक्य ती मदत करता येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून गरजूंना धर्मादाय संस्थांनी शक्य ती मदत करावी. आर्थिक स्वरूपातील मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी, बचत खाते क्रमांक 10972433751, स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400001, शाखा कोड 00300, आयएफएस कोड SBIN0000300 यावर धनादेश किंवा डिडी द्वारे शक्य तितक्या लवकर करावी, असे आवाहन राज्याचे धर्मादाय आयुक्त प्र. श्रा. तरारे यांनी केले आहे.