जिल्ह्यात कोरोनाचे आढळले नवे 6 रुग्‍ण !

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 11 ऑगस्टला नवे 6 कोरोनाबाधित समोर आले असून, 8 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या रुग्णालयात 61 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2507 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2501 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 6 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. …
 
जिल्ह्यात कोरोनाचे आढळले नवे 6 रुग्‍ण !

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 11 ऑगस्‍टला नवे 6 कोरोनाबाधित समोर आले असून, 8 रुग्‍णांना डिस्‍चार्ज मिळाला आहे. सध्या रुग्‍णालयात 61 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2507 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2501 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 6 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये रॅपीड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 751 तर रॅपिड टेस्टमधील 1750 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
चिखली तालुका : सावरगाव डुकरे 1, चिखली शहर : गणेशनगर 1, गांधीनगर 1, लोणार तालुका : बाभुळखेड हाडे 1, परजिल्हा रिसोड जि. वाशिम 2 अशाप्रकारे जिल्ह्यात 6 रुग्ण आढळले आहेत. आज 8 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.

61 रुग्‍णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 658699 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86611 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1773 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 658699 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87344 कोरोनाबाधित रुग्ण असून, पैकी 86611 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोविडचे 61 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.