जिल्हावासियांनो, पुढील 3 तास धोक्याचे!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने बुलडाणा जिल्ह्यासाठी तातडीचा अलर्ट दिला आहे. आज, 28 जून रोजी सायंकाळी 6 ते 9 या तीन तासांत तुरळक ठिकाणी विजांचा जोरदार गडगडाट होण्याची शक्यता आहे. पाऊस मात्र अत्यल्प होईल. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी शेतकरी बंधूंसह नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे. जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे, असे आवाहन जिल्हा …
 
जिल्हावासियांनो, पुढील 3 तास धोक्याचे!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नागपूरच्‍या प्रादेशिक हवामान केंद्राने बुलडाणा जिल्ह्यासाठी तातडीचा अलर्ट दिला आहे. आज, 28 जून रोजी सायंकाळी 6 ते 9 या तीन तासांत तुरळक ठिकाणी विजांचा जोरदार गडगडाट होण्याची शक्यता आहे. पाऊस मात्र अत्यल्प होईल. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी शेतकरी बंधूंसह नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे. जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्राचे मनिष येदुलवार यांनी केले आहे.