चिखली– धाड राष्ट्रीय महामार्गातील वनविभागाचा अडथळा दूर!; 592 वृक्ष तोडणार!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली – हातणी- धाड राष्ट्रीय महामार्गाच्या कामात वनविभागाचा अडथळा निर्माण झाला होता. या महामार्गाच्या कामाच्या आड 592 वृक्ष येत होते. ते तोडण्यास हिरवी झेंडी मिळाली आहे. ढालसावंगी (ता. बुलडाणा) येथील 4.844 हेक्टर वनक्षेत्रावरील रस्त्याच्या कामास वन विभागाने परवानगी दिली आहे. ही वनजमीन वळतीकरण प्रस्तावास केंद्र शासनाची तत्वत : मंजुरी प्राप्त …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखली – हातणी- धाड राष्ट्रीय महामार्गाच्‍या कामात वनविभागाचा अडथळा निर्माण झाला होता. या महामार्गाच्‍या कामाच्‍या आड 592 वृक्ष येत होते. ते तोडण्यास हिरवी झेंडी मिळाली आहे.

ढालसावंगी (ता. बुलडाणा) येथील 4.844 हेक्टर वनक्षेत्रावरील रस्‍त्‍याच्या कामास वन विभागाने परवानगी दिली आहे. ही वनजमीन वळतीकरण प्रस्तावास केंद्र शासनाची तत्वत : मंजुरी प्राप्त झाली आहे. 4.844 हेक्टर वनक्षेत्रावरील एकूण 592 वृक्षांची तोड करून वळतीकरण केलेल्या वनक्षेत्राच्‍या मर्यादेत प्रकल्पाची कामे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्र शासनाने या प्रकल्पास वन संवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत अटी नमूद करून तत्वत: मान्यता प्रदान केली आहे.

मंजूर केलेल्या वन क्षेत्रातच प्रकल्प यंत्रणा म्हणून वनक्षेत्रात काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रकल्प यंत्रणेकडून केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या नमूद कोणत्याही अटींचा भंग करण्यात येऊ नये. तसे केल्यास प्रकल्पाचे काम थांबविण्यात येणार आहे. प्रकल्पबाधित वनक्षेत्रातील वृक्षतोडीची कामे सुरू करताना ही कामे वनखात्याच्या विहीत कार्यपद्धतीनुसार खात्यामार्फत करण्यात येणार आहे, असे उपवनसंरक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.