चिखलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे “तहसील’समोर धरणे

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जनगणना हा ओबीसींचा हक्क असून, केंद्र शासनाने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रात आरक्षण देण्यात यावे, रद्द केलेले राजकीय आरक्षण परत करावे आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे चिखलीत ७ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे यांनी नेतृत्व केले. या वेळी तहसीलदारांना निवेदन …
 
चिखलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे “तहसील’समोर धरणे

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जनगणना हा ओबीसींचा हक्क असून, केंद्र शासनाने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रात आरक्षण देण्यात यावे, रद्द केलेले राजकीय आरक्षण परत करावे आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या ओबीसी सेलतर्फे चिखलीत ७ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे यांनी नेतृत्व केले. या वेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात जिल्हा सचिव नदीम देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष नंदु वराडे, महिंद्र वाघमोडे, बाबुराव थुट्टे, भागवत थुट्टे, अंकुश थुट्टे, गोविंद सुसर, विठ्ठल थुट्टे, अशोक थुट्टे, शंकर थुट्टे, संकेत पाटील, सोहम सावळे, जमिल शेख, आसिफ खान, सोनू अग्रवाल, दिलीप शितोळे, दीपक अंभोरे, सुनिल गाडेकर, नीलेश जाटोळे आदींचा सहभाग होता.