चांडोळ परिसरात लांडग्यांची दहशत; पुन्हा बकऱ्यांवर हल्ला; पाच बकऱ्या ठार, चार गंभीर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : धाड, चांडोळ परिसरात लांडग्याच्या भीतीने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दोन दिवसांत लाडग्यांने केलेल्या हल्ल्यात चांडोळ येथील दोन शेतकऱ्यांच्या १३ बकऱ्या ठार झाल्या आहेत. चांडोळ येथील शेतकरी मदनसिंग कुठंबरे यांनी त्यांच्या चांडोळ शिवारातील शेतातील गोठ्यात बकऱ्या बांधल्या होत्या. २१ ऑगस्टच्या रात्री लांडग्याने बकऱ्यांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात ५ बकऱ्या ठार …
 
चांडोळ परिसरात लांडग्यांची दहशत; पुन्हा बकऱ्यांवर हल्ला; पाच बकऱ्या ठार, चार गंभीर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : धाड, चांडोळ परिसरात लांडग्याच्या भीतीने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दोन दिवसांत लाडग्यांने केलेल्या हल्ल्यात चांडोळ येथील दोन शेतकऱ्यांच्‍या १३ बकऱ्या ठार झाल्या आहेत.

चांडोळ येथील शेतकरी मदनसिंग कुठंबरे यांनी त्यांच्या चांडोळ शिवारातील शेतातील गोठ्यात बकऱ्या बांधल्या होत्या. २१ ऑगस्टच्या रात्री लांडग्याने बकऱ्यांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात ५ बकऱ्या ठार तर ४ बकऱ्या गंभीर जखमी झाल्या. काल सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यामुळे शेतकऱ्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. २१ ऑगस्ट रोजी चांडोळ येथील विठ्ठलसिंग कुठंबरे यांच्या बकऱ्यांवरही लांडग्याने हल्ला चढविला होता. त्यात आठ बकऱ्या जागीच ठार झाल्या होत्या.