कोरोना चाचणी केल्यानंतर 15 दिवस ते 10 जण गावभर फिरले अन्‌ काल रिपोर्ट आला पॉझिटिव्‍ह; नांद्रा कोळीतील ग्रामस्‍थांचा संताप!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 28 एप्रिलला कोरोना चाचणी केलेल्यांचा अहवाल काल, 13 मे रोजी प्राप्त झाला. त्यात 23 पैकी 10 जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. हे 10 जण गेल्या 15 दिवसांपासून गावात बिनदिक्कत फिरत होते. त्यामुळे गावातील आणखी किती लोक बाधित झाले असतील, या भयाने नांद्रा कोळी (ता. बुलडाणा) हादरले आहे. 6 हजार लोकसंख्येचे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 28 एप्रिलला कोरोना चाचणी केलेल्यांचा अहवाल काल, 13 मे रोजी प्राप्त झाला. त्‍यात 23 पैकी 10 जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. हे 10 जण गेल्या 15 दिवसांपासून गावात बिनदिक्कत फिरत होते. त्‍यामुळे गावातील आणखी किती लोक बाधित झाले असतील, या भयाने नांद्रा कोळी (ता. बुलडाणा) हादरले आहे. 6 हजार लोकसंख्येचे हे गाव असून, या ठिकाणी पीएचसी असून, त्‍यावर श्रीमती नागलकर, प्रशांत बढे, राठोड या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नियंत्रण असते. जे 10 जण काल पॉझिटिव्‍ह आले ते वारंवार पीएचसीत येऊन अहवालाबद्दल विचारणा करत होते, मात्र कर्मचारी तुम्‍ही निगेटिव्‍हच असाल, अशी उत्तरे देऊन पाठवत होते आणि याचमुळे ते गावभर फिरत राहिले, असा आरोप ग्रामस्‍थांनी केला आहे. आरोग्‍य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्‍या हलगर्जीपणामुळे गावाचे आरोग्‍य धोक्‍याचे आल्याचे ग्रामस्‍थांचे म्‍हणणे आहे.