आमदार श्वेताताई महाले यांच्यावर यशस्वी शस्‍त्रक्रिया! म्हणाल्या, लवकरच आपली भेट होईल!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्यावर काल, 26 जूनला मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात आली. 2014 पासून त्यांच्या मान आणि खांद्यात बारीक गाठ झाली होती. दिवसेंदिवस गाठ मोठी होत गेल्याने डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन सांगितले होते. काल, 26 जूनला श्वेताताईंना रिलायन्स फाऊंडेशनच्या गिरगाव मुंबई या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉ तुषार थोरात, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्यावर काल, 26 जूनला मुंबईत शस्‍त्रक्रिया करण्यात आली. 2014 पासून त्यांच्या मान आणि खांद्यात बारीक गाठ झाली होती. दिवसेंदिवस गाठ मोठी होत गेल्याने डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन सांगितले होते. काल, 26 जूनला श्वेताताईंना रिलायन्स फाऊंडेशनच्या गिरगाव मुंबई या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉ तुषार थोरात, डॉ. दावर, डॉ. सुनील मापारी यांनी त्‍यांच्‍यावर शास्रक्रिया केली. डॉक्टरांनी 7 दिवस न बोलण्याची ताकिद दिली असल्याने आपला फोन बंद राहील; मात्र जनसंपर्क कार्यालय सेवालयच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात राहणार असल्याचे त्यांनी फेसबुक वर पोस्ट करून सांगितले.