आता तो विद्यार्थी म्हणतो, मी नक्षलवादी नव्हे, देशभक्त बनणार!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ) ः बँकेने शैक्षणिक कर्ज दिले नाही म्हणून नक्षलवादी बनण्याची धमकी देणार्या वैभवने आपले शब्द मागे घेत मी नक्षलवादी नव्हे तर देशभक्त नागरिक बनणार असल्याचे म्हटले आहे. बँकेने कर्ज न दिल्याने मी खूप डिप्रेशनमध्ये होतो. बँकेने पळापळ करायला लावल्याने व्यवस्थेबद्दल चिड आली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आत्महत्येस परवानगी आणि नक्षली होण्याची धमकी …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ) ः बँकेने शैक्षणिक कर्ज दिले नाही म्हणून नक्षलवादी बनण्याची धमकी देणार्‍या वैभवने आपले शब्द मागे घेत मी नक्षलवादी नव्हे तर देशभक्त नागरिक बनणार असल्याचे म्हटले आहे. बँकेने कर्ज न दिल्याने मी खूप डिप्रेशनमध्ये होतो. बँकेने पळापळ करायला लावल्याने व्यवस्थेबद्दल चिड आली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आत्महत्येस परवानगी आणि नक्षली होण्याची धमकी दिली होती. मी ते शब्द मागे घेतो. इतर विद्यार्थ्यांनीही असा चुकीचा विचार करू नये, असे आवाहनही त्याने केले आहे. समाजात खूप चांगली माणसे आहेत. पत्रानंतर मला मदतीचा ओघ सुरू झाला. खामगाव अर्बन बँकेने शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिल्याने पुढील शिक्षणाची चिंता मिटल्याचेही त्याने बुलडाणा लाइव्हशी बोलताना सांगितले. वैभव मानखैर हा संग्रामपूर तालुक्यातील काकोडा येथील आहे. खामगाव अर्बन बँकेने आज त्याला शैक्षणिक कर्ज मंजूर करून रकमेचा डीडी दिला आहे.