आज हळद लागणार होती… नवरदेवाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह; लग्न लांबणीवर, चिखली तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा वाढता धोका आता सर्वांनाच जाणवू लागला आहे. कधी, कुठे कोरोना गाठेल काहीच सांगता येत नाही. चिखली तालुक्यातील मलगी गावात अशीच एक घटना समोर आली आहे. आज, 27 एप्रिलला नवरदेवाला हळद लागणार होती. वर आणि वधूकडील मंडळींनी लग्नाची तयारी करून ठेवली. कोरोनामुळे उद्या, 28 एप्रिलला मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत हा मंगल …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा वाढता धोका आता सर्वांनाच जाणवू लागला आहे. कधी, कुठे कोरोना गाठेल काहीच सांगता येत नाही. चिखली तालुक्यातील मलगी गावात अशीच एक घटना समोर आली आहे. आज, 27 एप्रिलला नवरदेवाला हळद लागणार होती. वर आणि वधूकडील मंडळींनी लग्‍नाची तयारी करून ठेवली. कोरोनामुळे उद्या, 28 एप्रिलला मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत हा मंगल सोहळा पार पडणार होता. अशातच नवरदेवाला ताप आणि सर्दी, खोकल्याची लक्षणे जाणवू लागल्याने कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चाचणीत नवरदेवच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने दोन्हीकडील मंडळींनी लग्‍न लांबणीवर टाकण्याचा  निर्णय घेतला.