अपघातात गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; बुलडाणा-चिखली रोडवर झाला होता भीषण अपघात

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा- चिखली रोडवरील अंत्री फाट्याजवळ काल, २ जुलैला रात्री सव्वा आठला झालेल्या अपघातातील गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान रात्री उशिरा मृत्यू झाला. अंकित दत्तात्रय पाटील (२१, रा. खुपगाव, ता. बुलडाणा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंकित केळवदवरून घरी दुचाकीने खुपगावकडे परतत होता. अंत्री फाट्याजवळ बोलेरो पिकअपने त्याला जोरात धडक दिली. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा- चिखली रोडवरील अंत्री फाट्याजवळ काल, २ जुलैला रात्री सव्वा आठला झालेल्या अपघातातील गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान रात्री उशिरा मृत्यू झाला. अंकित दत्तात्रय पाटील (२१, रा. खुपगाव, ता. बुलडाणा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अंकित केळवदवरून घरी दुचाकीने खुपगावकडे परतत होता. अंत्री फाट्याजवळ बोलेरो पिकअपने त्याला जोरात धडक दिली. त्‍यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनमिळाऊ आणि मेहनती असलेला अंकित केळवद येथील एका ढाब्यावर काम करत होता. त्याच्या अकाली निधनाने खुपगाव गाव परिसरात शोककळा पसरली आहे.