…अन्यथा मेलेली जनावरे मंत्रालयात नेऊन टाकणार; “स्वाभिमानी’ नेते रविकांत तुपकरांचा बुलडाण्यात इशारा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यासह राज्यात गेल्या १५ दिवसांपासून पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. जिल्ह्यातील दीड हजारांपेक्षा अधिक पशुवैद्यकीय कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने पशुवैद्यकीय सेवा बाधित झाली आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे. संपादरम्यान उपचाराभावी जनावरांचा बळी गेला तर मेलेली जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयात व मंत्रालयात आणून टाकू, असा इशारा स्वाभिमानी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यासह राज्यात गेल्या १५ दिवसांपासून पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. जिल्ह्यातील दीड हजारांपेक्षा अधिक पशुवैद्यकीय कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने पशुवैद्यकीय सेवा बाधित झाली आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे. संपादरम्यान उपचाराभावी जनावरांचा बळी गेला तर मेलेली जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयात व मंत्रालयात आणून टाकू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज, २ ऑगस्‍टला जिल्ह्यातील पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व श्री. तुपकर यांनी केले, त्‍यावेळी ते बोलत होते.

खेड्यापाड्यावर जाऊन शेतकऱ्यांची सेवा करणाऱ्या खासगी पदवीधारक पशुवैद्यकांच्या समस्या निकाली काढा. पशुधन पर्यवेक्षकांची पदे न भरल्याने पशुधन पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांकडे अनेक दवाखान्यांचा अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत असल्याने ही पदे त्वरित भरावीत. राज्यातील पशुधन पर्यवेक्षक ते सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांच्या पदोन्‍नत्या त्वरित कराव्यात. सहाय्यक पशुधन विकास अधिकारी संवर्गाच्या विभागनिहाय असलेला असमतोल त्वरित दूर करावा. पशु वैद्यकीय परिषद अधिनियम १९८४ च्या कायद्यात बदल करावा. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत. प्रत्येक गावांमध्ये पशु प्रथमोपचार केंद्र स्थापन करावेत. या व अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पशु पदवीधारक पशुवैद्यकीय संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात पदवीधारक पशुवैद्यकीय संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते. आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे.