अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती; ३ सप्‍टेंबरपर्यंतच मुदत

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे यासाठी १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा 6 लक्ष रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयात शिष्यवृत्तीचा विहित नमुना अर्ज उपलब्ध आहे. परदेशात पदवी/ पदव्युत्तर शिक्षण …
 
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती; ३ सप्‍टेंबरपर्यंतच मुदत

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे यासाठी १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा 6 लक्ष रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयात शिष्यवृत्तीचा विहित नमुना अर्ज उपलब्ध आहे. परदेशात पदवी/ पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या अनुसूचित जमातीच्‍या विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयातून विहित नमुन्यातील शिष्यवृत्ती अर्ज प्राप्त करून परिपूर्ण माहिती भरून व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे प्रमाणित प्रतींसह परिपूर्ण अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्‍या कार्यालयात 3 सप्टेंबर 2021 पर्यंत सादर करावा. 3 सप्टेंबर 2021 नंतर सादर करण्यात आलेले अर्ज विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.