अजिंठा रोडवरील तो खोलगट भाग बेततोय वाहनधारकांच्‍या जिवावर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अजिंठा रोडवरील गुरुकुल आश्रमसमोर ऐन रस्त्यात खोलगट भाग तयार झाला असून, यामुळे वाहने अचानक आदळून अपघाताची शक्यता वाढली आहे. सध्या या खोलगट भागात सिमेंट टाकून समांतर करण्याचा प्रयत्न केला आहे, पण दुसऱ्या बाजूला तसाच खोलगट भाग कायम आहे. ठेकेदाराचा हा कारनामा वाहनधारकांच्या मात्र जिवावर बेतत असून, संबंधित विभागाने याकडे लक्ष …
 
अजिंठा रोडवरील तो खोलगट भाग बेततोय वाहनधारकांच्‍या जिवावर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अजिंठा रोडवरील गुरुकुल आश्रमसमोर ऐन रस्‍त्‍यात खोलगट भाग तयार झाला असून, यामुळे वाहने अचानक आदळून अपघाताची शक्‍यता वाढली आहे. सध्या या खोलगट भागात सिमेंट टाकून समांतर करण्याचा प्रयत्‍न केला आहे, पण दुसऱ्या बाजूला तसाच खोलगट भाग कायम आहे. ठेकेदाराचा हा कारनामा वाहनधारकांच्‍या मात्र जिवावर बेतत असून, संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन या ठिकाणी रस्‍त्याला समांतर असा सिमेंटचा भराव टाकावा, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. विशेष म्‍हणजे रस्‍त्‍याचे काम होऊन फारसा काळही लोटलेला नाही. तरीही हा खोलगट भाग तयार होऊन वाहनधारकांच्‍या जिवावर बेतत असल्याने कामाच्‍या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालण्याची गरज आहे.