“चिखलीच्‍या क्रीडा संकुलाला द्या शहीद कैलास भारत पवार यांचे नाव’

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देशासाठी नुकतेचे शहीद झालेले वीर जवान कैलास भारत पवार यांचे नाव चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाला देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे वसंतराव गाडेकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. जिल्ह्याचे सुपूत्र चिखली येथील वीर जवान कैलास भारत पवार हे …
 
“चिखलीच्‍या क्रीडा संकुलाला द्या शहीद कैलास भारत पवार यांचे नाव’

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देशासाठी नुकतेचे शहीद झालेले वीर जवान कैलास भारत पवार यांचे नाव चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाला देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे वसंतराव गाडेकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले.

जिल्ह्याचे सुपूत्र चिखली येथील वीर जवान कैलास भारत पवार हे द्रास सेक्टरमध्ये कर्तव्यावर असताना शहीद झाले होते. शहीद कैलास पवार यांनी सैन्यात भरती होण्यापूर्वी ज्या क्रीडा संकुल मैदानावर नियमित सराव केला होता, त्याच मैदानावर त्यांच्‍यावर ४ ऑगस्ट २०२१ रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

संकुलात शहरासह तालुक्यातील अनेक तरुण – तरुणी विविध क्रीडा प्रकारांचा सराव करण्यासाठी नियमिपणे येत असतात. त्यांच्यासाठी हे क्रीडासंकुल प्रेरणादायी व शक्तीस्थळ ठरावे व त्यातून देशप्रेमाची भावना वाढीस लागावी या उदात्त हेतूने या क्रीडा संकुलाला शहीद कैलास भारत पवार यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी जनमाणसातून मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी अभिजित वायकोस व नगराध्यक्षांना देण्यात आले. निवेदनावर वसंतराव गाडेकर, विशाल खरात, एस . एस . गवई, प्रताप भांबळे, राजेश गवई , विजय बोरकर, अभिमन्यू पवार, मुरलीधर विनकर, दत्ता सुसर, नरेंद्र पवार, संजय कासारे, शुभम पवार, छोटू अवसरमोल, सचिन शेजोळ, व्यंकटेश रिंढे, देवेश भुतेकर, नरेंद्र जाधव यांच्या सह्या आहेत.