सुखद वार्ता : आजपर्यंत तरी जिल्ह्यात डेल्टाचा एकही रुग्ण नाही!; पण त्याचा धोका कायम!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा धोकादायक विषाणू असलेल्या डेल्टा प्लसचे राज्यात रुग्ण वाढत असले तरी जिल्ह्यात मात्र आजअखेर एकही रुग्ण आढळून आला नाहीये. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच गुड न्यूज आहे. मात्र डेल्टाचा धोका मात्र कायम आहे. यामुळे आरोग्य यंत्रणासह जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे चित्र आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असतानाचा अतिशय …
 
सुखद वार्ता : आजपर्यंत तरी जिल्ह्यात डेल्टाचा एकही रुग्ण नाही!; पण त्याचा धोका कायम!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा धोकादायक विषाणू असलेल्‍या डेल्टा प्लसचे राज्यात रुग्ण वाढत असले तरी जिल्ह्यात मात्र आजअखेर एकही रुग्ण आढळून आला नाहीये. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच गुड न्यूज आहे. मात्र डेल्टाचा धोका मात्र कायम आहे. यामुळे आरोग्य यंत्रणासह जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे चित्र आहे.

तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असतानाचा अतिशय घातक व वेगाने फोफावणाऱ्या डेल्टा प्लसमुळे यंत्रणा धास्तावलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा ठरलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या समवेत चर्चा केली असता त्यांनी आरोग्य यंत्रणा या दोन्ही धोक्यासाठी दक्ष व सज्ज असल्याचे स्पष्ट केले. मागील काही महिन्यांपासून महिन्‍याकाठी 100 संशयित नमुने दिल्ली येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत असल्याचे डॉ. तडस यांनी सांगितले. सुदैवाने आजवर डेल्टा प्‍लसचा एकही रुग्ण आढळला नाहीये. मात्र त्याचा धोका कायम आहे. यामुळे यंत्रणा बारकाईने नजर ठेवून असल्याचे ते म्हणाले.

ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्णता
दरम्यान, या चर्चेत सीएस तडस यांनी जिल्ह्यासाठी आणखी एक गूड न्यूज दिली. काही महिन्यांपूर्वी वारंवार ऑक्सिजनचा तुटवडा अनुभवणाऱ्या बुलडाणा जिल्ह्याची आता स्वयं पूर्णतेकडे वाटचाल असल्याचे त्यांनी सांगितले. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची पाळी आलीच तर ही बाब सहाय्यभूत ठरेल. बुलडाणा येथील महिला रुग्‍णालयात 20 किलोमीटरचा प्लांट कार्यरत आहे. याशिवाय 20 ऑगस्टपर्यंत खामगाव येथे 20 तर देऊळगाव राजा आणि मेहकर येथे प्रत्येकी 6 किलोमीटरचा प्लांट सुरू होईल. याठिकाणी द्रव्यरुप ऑक्सिजन साठविण्याची व्यवस्था आहे. यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा हा शब्दच हद्दपार होईल, असे डॉ तडस म्हणाले.