सर्वदूर पावसाअभावी खोळंबल्या पेरण्या! ; ५० % टक्के पेरण्या बाकी

मेहकर तालुक्यात 75 टक्के पेरण्या आटोपल्या; शेगाव, मलकापूर, नांदुरावासियांना प्रतीक्षाबुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात सर्वदूर पाऊस नसल्याने जूनच्या शेवटच्या आठवड्यातसुद्धा जिल्ह्यातील 50 टक्के पेरण्या बाकी आहेत. 23 जूनपर्यंत 7 लाख 34 हजार 177 हेक्टर क्षेत्रापैकी 2 लाख 75 हजार 787 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी 37.65 टक्के असल्याची माहिती कृषी विभागाच्या …
 

मेहकर तालुक्यात 75 टक्के पेरण्या आटोपल्या; शेगाव, मलकापूर, नांदुरावासियांना प्रतीक्षा
बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः
जिल्ह्यात सर्वदूर पाऊस नसल्याने जूनच्या शेवटच्या आठवड्यातसुद्धा जिल्ह्यातील 50 टक्के पेरण्या बाकी आहेत. 23 जूनपर्यंत 7 लाख 34 हजार 177 हेक्टर क्षेत्रापैकी 2 लाख 75 हजार 787 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी 37.65 टक्के असल्याची माहिती कृषी विभागाच्‍या सूत्रांकडून बुलडाणा लाइव्‍हला मिळाली.

काल, 24 जूनला जिल्ह्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडल्याने पेरणीच्या टक्केवारीत काही प्रमाणात वाढ झाली, मात्र त्याचा नेमका अहवाल प्राप्त झाला नाही. जिल्ह्यातील 13 तालुक्यांपैकी शेगाव, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, मोताळा आणि देऊळगाव राजा तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने या भागातील पेरण्या खोळबंल्या आहेत. मेहकर तालुक्यात 75 टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या आहेत.

तालुकानिहाय पेरण्यांची टक्‍केवारी

  • मेहकर ः 75 टक्‍के
  • खामगाव ः 65.66
  • लोणार ः 64.90
  • सिंदखेडराजा ः 32.49
  • बुलडाणा ः 28.26
  • चिखली ः 25.65
  • मोताळा ः 38.34
  • नांदुरा ः 27.77
  • मलकापूर ः 24.06
  • शेगाव ः 21.60
  • जळगाव जामोद ः 13.13
  • संग्रामपूर ः 12.20
  • देऊळगाव राजा ः 11.31

आजवर झालेला तालुकानिहाय पाऊस

  • मेहकर ः 183.3 मि.मी.
  • चिखली ः 167.8 मि.मी.
  • खामगाव ः 119.5 मि.मी.
  • संग्रामपूर ः 100.6 मि.मी.
  • सिंदखेड राजा ः 137.2 मि.मी.
  • देऊळगाव राजा ः 64.3 मि.मी.
  • लोणार ः 87.9 मि.मी.
  • बुलडाणा ः 76.8 मि.मी.
  • नांदुरा ः 48.3 मि.मी.
  • मोताळा ः 43.1 मि.मी.
  • मलकापूर ः 37.9 मि.मी.
  • जळगाव जामोद ः 20.4 मि.मी.
  • शेगाव ः 7.6 मि.मी.
  • जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस ः 1094.7 मि.मी.
  • एकूण टक्केवारी-11.06 टक्के