लोणार सरोवरावर सेल्फी पॉईंटची निर्मिती; ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंना प्रोत्‍साहन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ऑलिम्पिक टोकियो-2020 चे आयोजन 23 जुलै ते 5 सप्टेंबर 2021 दरम्यान होणार आहे. महाराष्ट्राला अभिमान म्हणजे यावेळी 10 खेळाडूंची निवड टोकीयो ऑलिम्पिकसाठी झाली आहे. त्यामुळे हा आनंदाचा क्षण साजरा करणे आवश्यक आहे. ऑलिम्पिकचा कुंभमेळा म्हणजेच टोकियो-2020 आशिया खंडात टोकियो या शहरात दुसऱ्यांदा आयोजित होत आहे. एकाच शहरात दोनवेळा ऑलिम्पिक आयोजित …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ऑलिम्पिक टोकियो-2020 चे आयोजन 23 जुलै ते 5 सप्टेंबर 2021 दरम्यान होणार आहे. महाराष्ट्राला अभिमान म्हणजे यावेळी 10 खेळाडूंची निवड टोकीयो ऑलिम्पिकसाठी झाली आहे. त्यामुळे हा आनंदाचा क्षण साजरा करणे आवश्यक आहे. ऑलिम्पिकचा कुंभमेळा म्हणजेच टोकियो-2020 आशिया खंडात टोकियो या शहरात दुसऱ्यांदा आयोजित होत आहे. एकाच शहरात दोनवेळा ऑलिम्पिक आयोजित होणारे टोकीयो हे आशियाई खंडातील पहिलेच शहर आहे.

राज्यातील सहभागी खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन मिळण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा आणि जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा, तालुका क्रीडा संकुल, मलकापूर, रेल्वे स्टेशन, मलकापूर आदी ठिकाणी शुभेच्छा बॅनर, सेल्फी पॉईंट, स्टॅडी लावण्यात आलेले आहेत. जागतिक दर्जाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर, पर्यटन स्थळ लोणार सरोवर परिसर व पंचायत समिती समोरील लोणार धार पॉईंट याठिकाणी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंकरिता प्रोत्साहन देण्यासाठी शुभेच्छा बॅनर व स्टॅडी तर क्रीडाप्रेमी नागरिकांसाठी सेल्फी पॉईंटची निर्मिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्‍यामार्फत करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी नागरिक, क्रीडा मंडळे, संस्था, खेळाडू, एकविध खेळ क्रीडा संघटना, शारीरिक शिक्षण शिक्षक, विविध शासकीय, निमशासकीय अधिकारी- कर्मचारी यांनी ज्या ठिकाणी सेल्फी पॉईंटची निर्मिती केलेली आहे. त्याठिकाणी सेल्फी काढून व्हाॅट्स ॲप, फेसबुक, ट्विटर, यू ट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खेळाडूंना शुभेच्छा प्रदान कराव्यात. तसेच सहभागी महाराष्ट्रातील खेळाडूंनी अधिकाधिक मेडल्स भारतासाठी जिंकावेत, अशी सर्व क्रीडाप्रेमींनी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा प्रदान कराव्यात. लोणार सरोवर येथे भारतीय पुरातत्व विभागाचे श्री.भगत, विठ्ठल घारोड, सुरेश गुळवे, क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, विनोद गायकवाड, भिमराव पवार, क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत सेल्फी पॉईंटची निर्मिती केली आहे.