रुग्‍णवाहिकाचालकांच्‍या लुटीचा चाप!; दर निश्चित; अवाजवी दर आकारल्यास कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रुग्णवाहिकांची मागणी वाढली आहे. रुग्णवाहिका धारकांकडून अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, बुलडाणा यांच्याकडून रुग्णवाहिकांचे अधिकृत दर निश्चित करण्यात आले आहेत. निश्चित केलेल्या दरापेक्षा रुग्णवाहिका धारकाने जादा दर आकारल्यास तात्काळ उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ईमेल आयडी mh28@mahatranscom.in वर तक्रार नोंदवावी, असे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रुग्णवाहिकांची मागणी वाढली आहे. रुग्णवाहिका धारकांकडून अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्‍यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, बुलडाणा यांच्याकडून रुग्णवाहिकांचे अधिकृत दर निश्चित करण्यात आले आहेत. निश्चित केलेल्या दरापेक्षा रुग्णवाहिका धारकाने जादा दर आकारल्यास तात्काळ उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ईमेल आयडी mh28@mahatranscom.in वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व रुग्णवाहिका धारकांनी वाहनात नोंदवही ठेवणे आवश्यक आहे. यात रुग्णाचे नाव, पत्ता, दिनांक, मोबाइल क्रमांक, आकारलेले भाडे व रुग्णासोबत असलेल्या व्यक्तीचे नाव, पत्ता व मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे. वाहन यांत्रिकदृष्ट्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी वाहन मालकाची आहे.  भाडेदरपत्रक रुग्णवाहिकेच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे चालक व मालकास बंधनकारक आहे. जास्त दर आकरणी करणाऱ्या वाहन मालकावर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, बुलडाणा यांच्‍या आदेशानुसार प्रस्तावित दंडात्मक तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

असे आहे अधिकृत दर

रुग्‍णवाहिका (चार चाकीकरिता) :

  • भाडे दर इंधन विरहीत 300 कि. मी. पर्यंत 24 तासांकरीता (चालक व मदतनीस सहीत) 300 कि.मी. च्या वरचे प्रति कि. मी. दर, विना वातानुकूलीत रुग्णवाहिकेसाठी 1000 रुपये प्रति कि. मी. 4 रुपये प्रमाणे, वातानुकूलितसाठी 1100 रुपये प्रति कि.मी. 5 रूपये प्रमाणे.
  • भाडे दर 12 तास / 80 कि.मी. साठीचा एकूण दर (इंधन चालक व मदतनीस सहीत) 80 कि.मी.च्या वरचे प्रति कि.मी. दर विना वातानुकूलीत रुग्णवाहिकेसाठी 1600 रुपये प्रति कि.मी. 20 रुपये प्रमाणे, वातानुकूलितसाठी 1700 रुपये प्रति कि. मी 21 रूपये प्रमाणे.
  • भाडे दर 24 तास / 120 कि.मी. साठीचा एकूण दर (इंधन, चालक व मदतनीस सहीत) 120 कि.मी.च्या वरचे प्रति कि. मी. दर विना वातानुकूलीत रुग्णवाहिकेसाठी 2400 रुपये प्रति कि.मी 20 रुपये प्रमाणे, वातानुकूलीतसाठी 2500 रुपये प्रति कि. मी 21 रूपये प्रमाणे.

रुग्ण्वाहिका (सर्व सुविधा उपलब्ध असणारी) :

  • भाडे दर इंधन विरहीत 300 कि. मी. पर्यंत 24 तासांकरिता (चालक व मदतनीस सहीत) 300 कि.मी.च्या वरचे प्रति कि. मी. दर, विना वातानुकूलीत रुग्णवाहिकेसाठी 2100 रुपये प्रति कि.मी. 5 रुपये प्रमाणे, वातानुकूलीतसाठी 2100 रुपये प्रति कि.मी 5 रूपये प्रमाणे.
  • भाडे दर 12 तास / 80 कि.मी. साठीचा एकूण दर (इंधन चालक व मदतनीस सहीत) 80 कि.मी.च्या वरचे प्रति कि.मी. दर विना वातानुकूलित रुग्णवाहिकेसाठी 3100 रुपये प्रति कि.मी. 38.75 रुपये प्रमाणे, वातानुकूलितसाठी 3100 रुपये प्रति कि. मी. 38.75 रुपये प्रमाणे.
  • भाडे दर 24 तास / 120 कि.मी. साठीचा एकूण दर (इंधन, चालक व मदतनीस सहीत) 120 कि.मी.च्या वरचे प्रति कि. मी. दर विना वातानुकूलीत रुग्णवाहिकेसाठी 4600 रुपये प्रति कि.मी. 38.75 रुपये प्रमाणे, वातानुकूलितसाठी 4600 रुपये प्रति कि. मी. 38.75 रुपये प्रमाणे दर असतील.