रावसाहेब दानवे पाटील, प्रवीण दरेकर यांच्या हस्ते धाड येथील आधार कोविड केअर सेंटरचे उद्या उद्‌घाटन

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दयासागरजी महाले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नांनी सुरू होत असलेल्या आधार कोविड केअर सेंटरचे उद्घाटन 29 मे रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते होणार आहे. भाजपाचे राज्य उपाध्यक्ष, माजी पालकमंत्री संजय कुटे, भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दयासागरजी महाले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नांनी सुरू होत असलेल्या आधार कोविड केअर सेंटरचे उद्‌घाटन 29 मे रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते होणार आहे.

भाजपाचे राज्य उपाध्यक्ष, माजी पालकमंत्री संजय कुटे, भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार चैनसुख संचेती, बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक प्रशांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. सांगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  धाड येथील सहकार विद्या मंदिराच्या शाळेच्या वास्तूमध्ये आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या वतीने शासन व लोकसहभागातून हे कोविड केअर सेंटर सुरू होत आहे.  50  खाटांचे सर्वसामान्य पॉझिटिव्ह रुग्णांसाठी ते असणार आहे.

दरेकरांचा दौरा

प्रवीण दरेकर यांचा दौरा कार्यक्रम असा ः सकाळी ८ वाजता औरंगाबाद येथून वाहनाने धाडकडे (ता. बुलडाणा) प्रयाण, सकाळी ११ वाजता धाड येथे आगमन व कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२ वाजता धाड येथे राखीव, दुपारी १ वाजता मुंबईकडे वाहनाने प्रयाण करतील.