यंदाचा योग दिनही ऑनलाइन… जिल्ह्यात जय्यत तयारी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संयुक्त राष्ट्रांनी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय आयोजन समितीतर्फे 17 जून रोजी जिजामाता क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांच्या मार्गदर्शनानुसार उपशिक्षणाधिकारी किशोर पागोरे (माध्यमिक), आरोग्य भारतीचे डॉ.राजेश्वर उबरहंडे, क्रीडा भारतीचे सदानंद काणे, बाळ आयचित, रवींद्र गणेशे, भारत स्काऊट गाईडचे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः संयुक्त राष्ट्रांनी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय आयोजन समितीतर्फे 17 जून रोजी जिजामाता क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांच्‍या मार्गदर्शनानुसार उपशिक्षणाधिकारी किशोर पागोरे (माध्यमिक), आरोग्य भारतीचे डॉ.राजेश्वर उबरहंडे, क्रीडा भारतीचे सदानंद काणे, बाळ आयचित, रवींद्र गणेशे, भारत स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक एस. पी. आठवले, आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रशांत लहासे, योगांजली योगवर्ग योगविद्या धाम नाशिकच्या सौ. अंजली परांजपे, आयुष मंत्रालयाच्या डॉ. मंजू राजेजाधव, जिल्हा योग असोसिएशनचे अध्यक्ष पी. आर. उपर्वट, सचिव तेजराव डहाके, नेहरू युवा केंद्राचे धनंजय चाफेकर, एन. बी. धंदर, अनिल इंगळे, रवींद्र धारपवार, विजय बोदडे यांची प्रमुख उपस्‍थिती होती.

जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर सर्व शालेय विद्यार्थी, युवक-युवती, नागरिकांमध्ये योग विषयक आवड निर्माण करणे तसेच योगाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी 21 जूनला सकाळी 7 ते 7.45 वाजेपर्यंत गतवर्षीप्रमाणे यावर्षीही ऑनलाइन पध्दतीने कोरोना नियमाचे पालन करून आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा उपक्रम चांगल्याप्रकारे राबविण्यासाठी तसेच सर्वात जास्त सहभाग घेण्यासाठी सामान्य योग प्रोटोकॉलवर आधारीत जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी माध्य./प्राथ. कार्यालय, आयुष मंत्रालय, जिल्हा योग संघटना, आरोग्य भारती, क्रीडा भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, पतंजली योग समिती, नेहरू युवा केंद्र विविध क्रीडा मंडळे, महिला मंडळ, विविध एकविध खेळ संघटना, बुलडाणा जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, आयुर्वेद महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय व योग क्षेत्रात विविध कार्यरत संस्था यांच्‍या संयुक्त विद्यमाने युवक-युवती, योगाप्रेमी नागरीक, अधिकारी, कर्मचारी यांच्‍यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील, तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्था, संघटना, शासकीय निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये यांना ऑनलाईन पध्दतीने जास्तीत जास्त सहभागी होण्याकरीता आवाहन यावेळी करण्यात आले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा द्वारे योग दिनाचे औचित्य साधुन गुगल मिटद्वारे ऑनलाईन पध्दतीने21 जून 2021 रोजी सकाळी 7 ते 7.45 वा. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे. त्याबाबतची गुगल मिट लिंक https://meet. google.com.ftx-xsnk-tbn तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणाचे फेसबुक पेज लाईव्ह सुध्दा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानुसार या कार्याक्रमात जिल्ह्यातील नागरीक, युवक युवती, विद्यार्थी, खेळाडू, अधिकारी / कर्मचारी यांना सहभागी होता येईल. आपआपल्या घरी सामूहिक योग प्रात्यक्षिक करून तसा उपस्थितीचा सविस्तर अहवाल, कार्यक्रमाचे फोटो, योगास्थळ, सहभागी संख्या इत्यादी बाबतची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा नगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे सादर करावी असेही सभेमध्ये ठरले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रात्यक्षिक सकाळी 7 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथील हॉलमध्ये करण्यात येईल. या प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी सौ. अंचली परांजपे व प्रशांत लहासे व योगक्षेत्रात काम करणारे योगप्रेमी उपस्थित राहतील. प्रोजेक्टरवर लाईव्ह फेसबुक पेजद्वारे जास्तीत जास्त विद्यार्थी, खेळाडू, क्रीडाप्रेमी नागरीक, योग प्रेमी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हास्तर आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले. या तांत्रीक बाबीसाठी कैलास डुडवा, विनोद गायकवाड, किरण लहाने, आयुर्वेद महाविद्यालयातील कर्मचारी हे काम पाहतील. या सभेकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तर कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे यांनी प्रयत्न केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.