मेहकर ः त्यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; मानव सुरक्षा सेवा संघाची मागणी

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागात आग लागून दहा कोवळ्या जिवांचा दुर्दैवी अंत झाला. रुग्णालय प्रशासनाच्या निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभारामुळे ही घटना घडली असून, या घटनेतील दोषींवर तत्काळ कारवाई करून त्यांच्याविरुद्ध मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मेहकर येथील मानव सुरक्षा संघाने केली …
 

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागात आग लागून दहा कोवळ्या जिवांचा दुर्दैवी अंत झाला. रुग्णालय प्रशासनाच्या निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभारामुळे ही घटना घडली असून, या घटनेतील दोषींवर तत्काळ कारवाई करून त्यांच्याविरुद्ध मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मेहकर येथील मानव सुरक्षा संघाने केली आहे.

यावेळी मानव सुरक्षा सेवा संघाचे राष्ट्रीय महासचिव गजानन इंगळे, राष्ट्रीय सचिव गजेंद्र भिसे, विदर्भ उपप्रमुख अविनाश प्रधान, विदर्भ सहसचिव संतोष झोपाटे, जिल्हा मीडिया प्रभारी मुन्ना काळे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सौ. आरती दीक्षित, तालुकाध्यक्ष प्रवीण पर्‍हाड, महिला आघाडी तालुकाध्यक्ष राजश्री पाटील, तालुका कार्याध्यक्ष विशाल डोंगरे, तालुका उपाध्यक्ष शिवा डुकरे पाटील, महिला आघाडी सचिव सौ. मानसी दीक्षित, तालुका मीडिया प्रमुख सुनील मोरे, मीडिया प्रभारी फिरोज शाह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.