‘महा’वसुली! दोन महिन्यांत 37 कोटींची तिजोरीत गंगाजळी!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महावितरणचे जिल्ह्यात 4 लाख 44 हजार 857 ग्राहक आहेत. पैकी 2 लाख 66 हजार 674 जणांनी 37 कोटी 78 लाख रुपयांचा भरणा गेल्या दोन महिन्यांत (एप्रिल -मे2021) केला आहे. महावितरणचे जिल्ह्यात 3 विभाग तर 15 उपविभाग आहेत. बुलडाणा विभागात बुलडाणा, चिखली, धाड, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या उपविभागांचा समावेश होतो. …
 
‘महा’वसुली! दोन महिन्यांत 37 कोटींची तिजोरीत गंगाजळी!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महावितरणचे जिल्ह्यात 4 लाख 44 हजार 857 ग्राहक आहेत. पैकी 2 लाख 66 हजार 674 जणांनी 37 कोटी 78 लाख रुपयांचा भरणा गेल्या दोन महिन्यांत (एप्रिल -मे2021) केला आहे.

महावितरणचे जिल्ह्यात 3 विभाग तर 15 उपविभाग आहेत. बुलडाणा विभागात बुलडाणा, चिखली, धाड, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या उपविभागांचा समावेश होतो. खामगाव विभागात खामगाव शहर, खामगाव ग्रामीण, लोणार, मेहकर, संग्रामपूर आणि शेगाव या उपविभागांचा समावेश आहे. मलकापूर विभागात जळगाव जामोद, मलकापूर, मोताळा आणि नांदुरा या उपविभागांचा समावेश होतो.

खामगाव विभागात सर्वाधिक ग्राहक

  • खामगाव – 1,67,361
  • बुलडाणा – 1,51,184
  • मलकापूर – 1,26312

एप्रिलमध्ये 17 कोटी तर मे महिन्यात 20 कोटींची वसुली
गेल्या दोन महिन्यांत महावितरणने एप्रिल महिन्यात 17 कोटी 33 लाख तर मेमध्ये 20 कोटी 45 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. यातही खामगाव विभागाने 15 कोटी 16 लाख रुपयांची वीजबिल वसुली करत पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. त्यापाठोपाठ मलकापूर 11 कोटी 43 लाख आणि बुलडाणा 11 कोटी 18 लाखांचा नंबर लागतो. 1 लाख 10 हजार 169 जणांनी ऑफलाइन तर 1 लाख 56 हजार 505 जणांनी ऑनलाइन वीजबिल भरणा केला.

…तर ग्रामपंचायतला मिळणार 30 टक्के
वीजबिल वसुलीसाठी महावितरणला ग्रामपंचायत कार्यालयाने मदत केल्यास वसुली केलेल्या रकमेपैकी 30 टक्के वाटा हा ग्रामपंचायतीला मिळणार आहे. त्यातून गावाच्या विकासासाठी मोठा निधी उभा करायला मदत होईल. म्हणून वीजबिल वसुलीसाठी ग्रामपंचायतीने महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांनी केले आहे.