महाराष्ट्र चेंबर्सचे ‘ऑक्सिजन दान’! 55 उपकरणे दिली

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः व्यापार, उद्योग जगताच्या हितासाठी झटतानाच सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरने कोरोना प्रकोपातही आपला बाणा जपला आहे. संस्थेने जिल्ह्याला 50 ऑक्सिजन काँसेन्ट्रेटर व 5 बीआयपीएपी दान केले आहे. ही उपयुक्त उपकरणे जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. राज्य किंवा राष्ट्र संकटात असताना या संस्थेने नेहमीच …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः व्यापार, उद्योग जगताच्या हितासाठी झटतानाच सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरने कोरोना प्रकोपातही आपला बाणा जपला आहे. संस्थेने जिल्ह्याला 50 ऑक्सिजन काँसेन्‍ट्रेटर व 5 बीआयपीएपी दान केले आहे. ही उपयुक्त उपकरणे  जिल्ह्याला प्राप्त झाली आहे.

राज्य किंवा राष्ट्र संकटात असताना या संस्थेने नेहमीच सढळ हाताने शासनाला वा आपाद्‌ग्रस्तांना मदत करण्याची परंपरा एमसीसीआयएने कायम जोपासली आहे. कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने संस्थेचे अध्यक्ष सुधीर मेहता व संचालक प्रशांत गिरबाजे यांच्या पुढाकाराने व  पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स च्या माध्यमाने राज्यातील जिल्ह्यांना उपकरणे, साहित्य दान देण्याचा निर्णय घेण्यात आला.  यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून उपकरणांचे वितरण करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यात हे साहित्य काल, 7 मे रोजी प्राप्त झाले. ओसी हे रुग्णाला ऑक्सिजन देणारे पोर्टेबल मशीन असून कुठेही हलवता येते. बीआयपीएपी हे व्हेंटिलेटर सारखे उपकरण आहे. संस्थेने जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी तात्काळ प्रतिसाद दिला. आरडीसी दिनेश गीते व उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे यांनी तात्काळ नियोजन करत ही उपकरणे पुणे येथून जिल्ह्यात आणण्याची व्यवस्था केली.