मर्जीतील लोकांनाच चिखलीच्‍या बाजार समितीचे केले प्रशासक?

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने त्याठिकाणी प्रशासक मंडळ नेमण्यात आले. मात्र प्रशासक मंडळात एकही महिला नाही. त्यामुळे महिलांविषयी भेदभावाचे सत्र सुरू केले का, असा सवाल सभापती सौ. सिंधुताई तायडे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे केला आहे. चिखली तालुक्यात अनेक महिला शेतकरी आहेत. महिलांना ५० टक्के आरक्षण दिलेले आहे. मात्र …
 
मर्जीतील लोकांनाच चिखलीच्‍या बाजार समितीचे केले प्रशासक?

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने त्याठिकाणी प्रशासक मंडळ नेमण्यात आले. मात्र प्रशासक मंडळात एकही महिला नाही. त्‍यामुळे महिलांविषयी भेदभावाचे सत्र सुरू केले का, असा सवाल सभापती सौ. सिंधुताई तायडे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे केला आहे.

चिखली तालुक्यात अनेक महिला शेतकरी आहेत. महिलांना ५० टक्‍के आरक्षण दिलेले आहे. मात्र प्रशासक नियुक्ती करताना त्यात ५० टक्‍के महिला असल्याच पाहिजे असा नियम किंवा कायदा नाही. मात्र तरीसुद्धा कोणत्याही ठिकाणी अशासकीय प्रशासक नेमताना महिलांचा विचारच केला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. नियम नाही किंवा कायदा नाही म्हणून महिलांच्या नावाचा विचारच होणार नसेल तर हा महिलांवर होणारा अत्याचार आहे आणि हा अत्याचार या काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघाडी सरकारने केला आहे आणि हा अन्याय व अत्याचार अजून किती दिवस सहन करायचा असा प्रश्न सौ. तायडे यांनी केला आहे. मर्जीतील लोकांनाच प्रशासक म्हणून संधी दिलेली आहे. त्यामुळे प्रशासक म्हणून सर्व जाती संवर्गाला सुद्धा स्थान मिळालेले नाही. पुरुषांच्या बरोबरीने महिलांची संख्या असताना त्यांना प्रशासक म्हणून संधी न देणे हा महिलांचा अपमान आहे. त्‍यामुळे बाजार समितीवर प्रशासक म्हणून महिलांना स्थान देण्यात यावे, अशी मागणी सौ. तायडे यांनी केली आहे.