बुलेट ट्रेनचा थांबा मेहकरमध्ये!; रेल्वे राज्यमंत्री दानवेंनी सांगितला “प्लॅन’!

बुलडाणा/औरंगाबाद (लाइव्ह ग्रुप वृत्तसेवा) ः रेल्वे राज्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रावसाहेब दानवे काल, १८ ऑगस्ट रोजी पहिल्यांदाच औरंगाबादला आले. त्यांनी रेल्वेच्या मेगा प्लॅनची माहिती पत्रकारांना दिली. मुंबई -नागपूर बुलेट ट्रेन हा रेल्वेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे ते म्हणाले. मुंबई- नागपूर बुलेट ट्रेन मार्गाची लांबी ७३९ कि.मी. राहणार असून, या मार्गावर १० जिल्ह्यांत १४ स्टेशन राहणार आहेत. …
 
बुलेट ट्रेनचा थांबा मेहकरमध्ये!; रेल्वे राज्यमंत्री दानवेंनी सांगितला “प्लॅन’!

बुलडाणा/औरंगाबाद (लाइव्ह ग्रुप वृत्तसेवा) ः रेल्वे राज्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रावसाहेब दानवे काल, १८ ऑगस्ट रोजी पहिल्यांदाच औरंगाबादला आले. त्यांनी रेल्वेच्या मेगा प्लॅनची माहिती पत्रकारांना दिली. मुंबई -नागपूर बुलेट ट्रेन हा रेल्वेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे ते म्‍हणाले. मुंबई- नागपूर बुलेट ट्रेन मार्गाची लांबी ७३९ कि.मी. राहणार असून, या मार्गावर १० जिल्ह्यांत १४ स्टेशन राहणार आहेत. यात बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचा समावेश आहे.

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना या मार्गाला लागूनच मुंबई- नागपूर बुलेट ट्रेनचा प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे. १० जिल्ह्यांतून हा रेल्वे मार्ग जाणार असून, यामुळे नागपूर- मुंबई हा प्रवास फक्त साडेतीन तासांत पूर्ण करता येणार आहे, असेही श्री दानवे म्हणाले. बुलडाणा जिल्ह्यातून बुलेट ट्रेन ८७ कि.मी. धावणार आहे. यापूर्वीच समृद्धी महामार्गासाठी शेतजमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. आता प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी बुलडाणा जिल्ह्यातील ४७ गावांमधील १२४५ हेक्टर जमीन या मार्गासाठी लागणार आहे. विशेष म्हणजे या रेल्वेत एका वेळी जास्तीत जास्त ७५० प्रवाशी प्रवास करू शकणार आहेत.