बुलडाण्याच्‍या चेतनानगरात आढळले ४ कोरोनाबाधित, शेगावमध्ये १!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 17 ऑगस्टला नव्याने 5 कोरोनाबाधित समोर आले. दिवसभरात 3 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 35 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्याअहवालांपैकी एकूण 1352 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1347 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 5 अहवाल पॉझिटिव्ह …
 
बुलडाण्याच्‍या चेतनानगरात आढळले ४ कोरोनाबाधित, शेगावमध्ये १!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 17 ऑगस्‍टला नव्याने 5 कोरोनाबाधित समोर आले. दिवसभरात 3 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. सध्या 35 रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्याअहवालांपैकी एकूण 1352 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1347 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 5 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 1 व रॅपिड अँटिजेन चाचणीमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 431 तर रॅपिड टेस्टमधील 916 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : चेतनानगर 4, शेगाव शहर : नागझरी रोड 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 5 रुग्ण आढळले आहेत. आज 3 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.

एकूण बाधितांचा आकडा 87361 वर
आजपर्यंत 669667 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86654 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1697 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले होते. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87361 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या 35 रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.