बुलडाणेकरांनो निर्बंध कायमच आहेत!; अफवांना बळी पडू नका..!; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी 31 मे रोजी 15 दिवसांसाठी लागू केलेले निर्बंध कायम असून, जिल्हा अनलॉक झालेला नाही. नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन आहे. त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे अफवांना बळी पडू नका. कोरोनाचा संसर्ग अजून पूर्णपणे थोपवलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध उठविण्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी 31 मे रोजी 15 दिवसांसाठी लागू केलेले निर्बंध कायम असून, जिल्हा अनलॉक झालेला नाही. नव्‍या नियमांचा प्रस्‍ताव अजून विचाराधीन आहे. त्‍यावर निर्णय झालेला नाही. त्‍यामुळे अफवांना बळी पडू नका.

कोरोनाचा संसर्ग अजून पूर्णपणे थोपवलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. त्‍यामुळे जिल्ह्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दी चेनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सरकारने सुरुवात केली आहे. यापुढे जाताना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्‌सची उपलब्धता हे निकष ठेवण्यात येत आहेत. या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासननिर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील. अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन आहे. जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल.