बिबट्या काय कमी होता आता अस्वलाचाही जाच!

अमडापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाभरात सध्या बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी बिबट्या दिसल्याच्या वार्ता आहेत. काही ठिकाणी त्याने पाळीव जनावरांचा फडशा पण पाडला आहे. त्यामुळे शेतकरी रात्री पिकांना पाणी द्यायला जातानाही घाबरत आहेत. बिबट्याचा हा कहर कमी होता की काय म्हणून आता अस्वलानेही जाच सुरू केला आहे. अमडापूर (ता. चिखली) जवळील बल्लाळ देवी …
 

अमडापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाभरात सध्या बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी बिबट्या दिसल्याच्या वार्ता आहेत. काही ठिकाणी त्याने पाळीव जनावरांचा फडशा पण पाडला आहे. त्यामुळे शेतकरी रात्री पिकांना पाणी द्यायला जातानाही घाबरत आहेत. बिबट्याचा हा कहर कमी होता की काय म्हणून आता अस्वलानेही जाच सुरू केला आहे. अमडापूर (ता. चिखली) जवळील बल्लाळ देवी मंदिर परिसरात अस्वलाचा वावर दिसून आल्याने शेतकरी भांबावले आहेत. रात्रीच्या वेळी शेतात पिकांना देण्यास जाताना अनेक शेतकर्‍यांना अस्वल दिसून आढळले. त्यामुळे भीतीने वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तातडीने दखल घेऊन अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र काळे, नितीन जाधव, कोंडूबा केवट, बाळू जाधव, शिक्षक गव्हाणे यांना अस्वलाचे दर्शन झाल्याचे सांगण्यात आले.