दिलासा मिळाला भो!; सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत उघडा सर्व दुकाने!; हॉटेल्स-रेस्‍टॉरंट, आठवडे बाजार तूर्त बंदच!!, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने आज, 31 मे रोजी आणखी 15 दिवस निर्बंध लागू करण्याचा आदेश देताना जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिलासाही दिला आहे. सर्व प्रकारची दुकाने (केवळ एकल दुकाने. शॉपिंग मॉलमधील नव्हे) सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र शनिवार, …
 
दिलासा मिळाला भो!; सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत उघडा सर्व दुकाने!; हॉटेल्स-रेस्‍टॉरंट, आठवडे बाजार तूर्त बंदच!!, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः जिल्ह्यातील कोरोना रुग्‍णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने आज, 31 मे रोजी आणखी 15 दिवस निर्बंध लागू करण्याचा आदेश देताना जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिलासाही दिला आहे. सर्व प्रकारची दुकाने (केवळ एकल दुकाने. शॉपिंग मॉलमधील नव्‍हे) सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र शनिवार, रविवार दुकाने बंद राहतील. केवळ अत्‍यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 पासून दुपारी 2 पर्यंत आणि शनिवार-रविवार सकाळी 7 पासून 11 वाजेपर्यंत वेळ दिली आहे. याशिवाय जिल्ह्याच्‍या सीमा सीलच राहणार आहेत. परजिल्ह्यात जाण्यासाठी पोलीस अधीक्षकांची परवानगी लागणार आहे. हॉटेल्स, रेस्‍टॉरंट बंदच राहणार असून, त्‍यांना केवळ पार्सल सेवा देता येईल. मंगल कार्यालये, लॉन्सही बंद राहतील. बाजार समिती सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मॉर्निंग अन्‌ इव्हिनिंग वॉकवर अद्याप बंदी कायम ठेवण्यात आली आहे. बँका सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत सुरू असतील.

काल मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधित करताना काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्‍या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बुलडाणा लाइव्‍हचे फोन दुपारपासून खणखणत होते. निर्बंधांचे काय, उद्या दुकाने उघडणार का याबद्दल विचारणा होत होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश संध्याकाळी प्राप्‍त झाला. त्‍यांनी जिल्हावासियांना निर्बंधांतून बराचसा दिलासा दिल्याचे आदेशातून दिसून येते. हे आदेश उद्या, 1 जूनच्‍या सकाळी 7 पासून तर 15 जूनच्‍या सकाळी 7 पर्यंत लागू असतील.

  • काय म्‍हटलेय आदेशात…
    सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्‍तूंची दुकाने, किराणा, स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला व फळविक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2, शनिवार-रविवारी सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत सुरू असतील. त्‍यांना घरपोच पार्सल देण्यासाठी सायंकाळी 7 पर्यंत मुभा असेल.
  • दूध डेअरी सकाळी 6 ते सकाळी 9 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत सुरू असेल. घरपोच दूधविक्री नियमित वेळेनुसार सुरू राहील.
  • चिकन-मटन दुकाने, स्‍वीटमार्ट, पाळीव प्राण्यांच्‍या खाद्यपदार्थांची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 आणि शनिवार-रविवारी सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत सुरू असतील.
  • कृषी केंद्र व शेतीविषयक साहित्‍याची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते दुपारी 3 आणि शनिवार-रविवारी सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत सुरू असतील.
  • सर्व बँका, पतसंस्‍था आणि आर्थिक बाबींशी संबंधित सर्व वित्तीय संस्‍था सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत नागरिकांसाठी सुरू असतील. कार्यालयीन कामकाज त्‍यांच्‍या नियमित वेळेनुसार चालू असेल.
  • पावसाळी हंगामाशी संबंधित साहित्‍य विकणारी दुकाने सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत सुरू असतील.
  • शहरातील पेट्रोलपंप, गॅसपंप सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 आणि शनिवार-रविवारी सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू असतील. त्‍यानंतर शासकीय वाहने, रुग्‍णवाहिका, अत्‍यावश्यक सेवेतील वाहने, शेतकऱ्यांची ट्रॅक्‍टर्सना पेट्रोल, डिझेल देता येईल. एमआयडीसी व हायवेवरील पेट्रोलपंप नियमित वेळेनुसार सुरू राहतील.
  • मद्यविक्रीची सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत केवळ घरपोच सेवा सुरू असेल. कोणत्‍याही परिस्‍थिती दुकान उघडता येणार नाही.
  • रेस्‍टॉरंट, भोजनालये, उपहारगृहे बंदच राहणार असून, सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत घरपोच सेवाच देऊ शकतील.
  • बाजार समिती सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू असेल.
  • वकिल, सीए यांची कार्यालये सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू असतील.
  • चष्म्यांची दुकाने सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत सुरू असतील.
  • वृत्तपत्रांची छपाई व वितरण, शिवभोजन नियमित वेळेनुसार सुरू असेल.
  • सीएससी सेंटर्स सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत सुरू असतील.
  • सर्व सार्वजनिक आणि खासगी बस, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहनांची वाहतूक केवळ अत्‍यावश्यक कामांसाठी सुरू असेल.

…नंतर घराबाहेर पडाल तर कारवाई!
वैद्यकीय व अत्‍यावश्यक सेवा वगळता तसेच घरपोच सेवेसाठी परवानगी देण्यात आलेल्या बाबी वगळता दुपारी 3 नंतर कोणत्‍याही व्‍यक्‍तीस अत्‍यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

हे राहणार पूर्णपणे बंद…
सलून, स्‍पा, ब्‍युटी पार्लर, शाळा-महाविद्यालये, क्‍लासेस, मंगल कार्यालये, लॉन्स, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, सभागृहे, आठवडी बाजार पूर्णपणे पुढील 15 दिवस तरी बंद असतील. सरकारी कार्यालये अभ्यागतांसाठी बंदच असतील.

हे नियमित सुरू राहील…
खासगी- सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्‍सा सेवा, मेडिकल स्‍टोअर्स, दवाखाने, ऑनलाइन औषधी सेवा, प्रसारमाध्यमांची कार्यालये, ई-कॉमर्स सेवा.