डॉ आस्मा मुजावर ठरल्या जिल्ह्यातील उत्कृष्ट नायब तहसीलदार !
Aug 5, 2022, 15:42 IST
सिंदखेडराजा( बाळासाहेब भोसले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)
महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सिंदखेडराजा येथील नायब तहसीलदार डॉ. आस्मा मुजावर ह्या जिल्ह्यातील उत्कृष्ट नायब तहसीलदार ठरल्या आहेत.
महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सिंदखेडराजा येथील नायब तहसीलदार डॉ. आस्मा मुजावर ह्या जिल्ह्यातील उत्कृष्ट नायब तहसीलदार ठरल्या आहेत.
महसूल दिनाच्या औचित्य साधून बुलढाणा येथे दि ३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी एस .राममूर्ती यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला .
महसूल विभागात डॉ. अस्मा मुजावर यांची धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी पुरवठा, निवडणूक , निवासी नायब तहसिलदार आणि महसूल विभागात उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना उत्कृष्ट नायब तहसीलदार अधिकारी म्हणून त्यांचा गौरव केला . यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार सुनील सावंत आदी सह अनेक अधिकारी उपस्थित होते.