जून मध्यावरही जिल्ह्यातील 226 गावांतील पाणीटंचाईचा मुक्काम कायम!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जूनच्या मध्यावरही जिल्ह्यातील पाणी टंचाईचा मुक्काम कायम असल्याचे मजेदार तितकेच गंभीर चित्र आहे. सध्या 226 गावांतील हजारो रहिवासीयांची तहान टँकर व खासगी अधिग्रहित विहिरींद्वारे भागविली जात आहे. यंदा पावसाने 25 मेपासून सुरू झालेल्या रोहिणी नक्षत्रापासून सुरुवात केली. त्यानंतर पावसाने वेळोवेळी हजेरी लावली. मात्र झालेला पाऊस दमदार, वाहता …
 
जून मध्यावरही जिल्ह्यातील 226 गावांतील पाणीटंचाईचा मुक्काम कायम!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जूनच्या मध्यावरही जिल्ह्यातील पाणी टंचाईचा मुक्काम कायम असल्याचे मजेदार तितकेच गंभीर चित्र आहे. सध्या 226 गावांतील हजारो रहिवासीयांची तहान टँकर व खासगी अधिग्रहित विहिरींद्वारे भागविली जात आहे.

यंदा पावसाने 25 मेपासून सुरू झालेल्या रोहिणी नक्षत्रापासून सुरुवात केली. त्यानंतर पावसाने वेळोवेळी हजेरी लावली. मात्र झालेला पाऊस दमदार, वाहता व नियमित नसल्याने तो सध्यातरी कुचकामी ठरला आहे. त्यामुळे लाखो नागरिकांची पाण्यासाठीची भटकंती कायम आहे. सध्या 24 गावांना 24 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात पिंपरखेड, ढासाळवाडी, हनवतखेड, सावळा, भादोला, देव्हारी, डोंगरखंडाळा, चौथा व सुंदरखेड (ता. बुलडाणा), असोला तांडा, तंबूलवाडी, सैलानीनगर कोलारा (ता. चिखली), वडाळी, रत्नापूर, पारडी (ता. मेहकर), चिंचखेड नाथ, इसालवाडी, टेकडी तांडा, पोफळी (ता. मोताळा), कोलासार सांगवा, पिंपळखुटा (ता. नांदुरा), सावरगाव माळ, दरेगाव (ता. सिंदखेडराजा) व किनगाव जट्टू (ता. लोणार) या गावांचा समावेश आहे. याशिवाय 202 गावांना 229 खासगी अधिग्रहित विहिरीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.