जिल्ह्यात नवे ३ कोरोनाबाधित रुग्‍ण आढळले; सध्या ४२ जण घेताहेत उपचार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 14 ऑगस्टला कोरोनाचे नवे 3 रुग्ण समोर आले असून, दिवसभरात 20 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 42 बाधित उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1854 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1851 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 3 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले …
 
जिल्ह्यात नवे ३ कोरोनाबाधित रुग्‍ण आढळले; सध्या ४२ जण घेताहेत उपचार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 14 ऑगस्‍टला कोरोनाचे नवे 3 रुग्‍ण समोर आले असून, दिवसभरात 20 रुग्‍णांना डिस्‍चार्ज देण्यात आला. सध्या 42 बाधित उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1854 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1851 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 3 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 1 व रॅपिड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 314 तर रॅपिड टेस्टमधील 1537 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
चिखली तालुका : मंगरूळ 1, संग्रामपूर तालुका : पिंप्री 1, परजिल्हा : वरूड (ता. जाफराबाद जि. जालना) 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 3 रुग्ण आढळले आहेत. आज 20 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.

एकूण बाधितांचा आकडा 87354 वर
आजपर्यंत 665039 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86640 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1440 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87354 कोरोनाबाधित रुग्ण असून, पैकी 86640 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोविडचे 42 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.