जिल्ह्यात नवे दोन कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍ण!; सध्या २५ रुग्‍ण घेताहेत उपचार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 21 सप्टेंबरला 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर 5 रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या रुग्णालयांत 25 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 908 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 906 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 2 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त …
 
जिल्ह्यात नवे दोन कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍ण!; सध्या २५ रुग्‍ण घेताहेत उपचार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 21 सप्‍टेंबरला 2 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळले आहेत, तर 5 रुग्‍णांना बरे झाल्याने डिस्‍चार्ज मिळाला आहे. सध्या रुग्‍णालयांत 25 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 908 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 906 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 2 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 46 तर रॅपिड टेस्टमधील 860 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
चिखली तालुका : काटोडा 1, बेराळा 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 2 रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाबाधितांचा आकडा 87550 वर
आजपर्यंत 711770 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86852 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 854 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87550 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 25 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 673 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.