चिखलीतील सैनिकाचा जम्‍मू काश्मिरमध्ये कर्तव्यावर असताना मृत्‍यू!; उद्या येणार पार्थिव

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जम्मू काश्मीरमधील द्रास सेक्टर भागात कर्तव्यावर असताना चिखलीच्या जवानाचा मृत्यू झाला. कैलास भारत पवार (२५, रा. गजानननगर, चिखली) असे या जवानाचे नाव असून, ३१ जुलैला सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून सांगण्यात आले. उद्या, ३ ऑगस्टला दुपारपर्यंत पार्थिव चिखलीत पोहोचण्याची शक्यता आहे.कैलास …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जम्मू काश्मीरमधील द्रास सेक्टर भागात कर्तव्यावर असताना चिखलीच्या जवानाचा मृत्यू झाला. कैलास भारत पवार (२५, रा. गजानननगर, चिखली) असे या जवानाचे नाव असून, ३१ जुलैला सायंकाळी त्‍यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून सांगण्यात आले. उद्या, ३ ऑगस्टला दुपारपर्यंत पार्थिव चिखलीत पोहोचण्याची शक्यता आहे.
कैलास पवार हे १० महार रेजिमेंटमध्ये द्रास सेक्टर येथे कार्यरत होते. मूळचे अंबाशी येथील असणारे पवार कुटुंब गेल्या २५ वर्षांपासून चिखली येथील गजानननगरात राहते. कैलास पवार यांच्या आई अंगणवाडी सेविका तर वडील मजुरी करतात. कैलास यांना एक मोठा भाऊ व एक लहान बहीण आहे. वर्षभरापूर्वी कर्तव्यावर गेलेले कैलास पवार आज २ ऑगस्टला सुटीवर घरी पोहोचणार असल्याचे त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितले होते. मात्र त्‍याआधीच काळाने त्‍यांच्‍यावर घाला घातला. त्‍यांच्या मृत्यूचे नेमके अद्यापपर्यंत जिल्हा सैनिक कार्यालयाला प्राप्‍त झालेले नाही. द्रास सेक्टर येथे उंचावर ऑक्सिजनची कमतरता असल्याने अशा दुर्घटना होतात, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी सांगितले. पवार यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असा आप्तपरिवार आहे.