चिखलीच्या नगराध्यक्षांची घोषणा हवेतच विरली; शहीद पवार यांच्‍या स्मारकासाठी होणार उपोषण!, घोषणा मने जिंकण्यासाठीच होती का?

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गैरव्यवहारांच्या आरोपांनी बरबटलेल्या चिखली नगरपालिकेसमोर शहीद कैलास पवार यांच्या स्मारकासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. दस्तुरखुद्द नगराध्यक्षांनी स्मारकाची घोषणा केली होती. अंत्यविधीवेळी देशभक्तांची मने जिंकण्यासाठीच त्यांनी ही घोषणा केली होती का, असा प्रश्न आता चिखलीकरांना पडला आहे. जम्मू काश्मीर येथील द्रास सेक्टरमध्ये कर्तव्यावर असताना चिखली येथील वीर …
 
चिखलीच्या नगराध्यक्षांची घोषणा हवेतच विरली; शहीद पवार यांच्‍या स्मारकासाठी होणार उपोषण!, घोषणा मने जिंकण्यासाठीच होती का?

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गैरव्यवहारांच्‍या आरोपांनी बरबटलेल्या चिखली नगरपालिकेसमोर शहीद कैलास पवार यांच्‍या स्‍मारकासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या पदाधिकाऱ्यांना उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. दस्तुरखुद्द नगराध्यक्षांनी स्‍मारकाची घोषणा केली होती. अंत्‍यविधीवेळी देशभक्‍तांची मने जिंकण्यासाठीच त्‍यांनी ही घोषणा केली होती का, असा प्रश्न आता चिखलीकरांना पडला आहे.

जम्मू काश्मीर येथील द्रास सेक्टरमध्ये कर्तव्यावर असताना चिखली येथील वीर जवान कैलास पवार शहीद झाले होते. चिखली येथे त्यांचे भव्य स्मारक उभारावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे नगरपरिषद कार्यालयासमोर आज, ११ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे विधानसभा सरचिटणीस प्रशांत डोंगरदिवे आणि व्हीजेएनटी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील सुरडकर उपोषणाला बसले आहेत. शहीद कैलास पवार यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा नगराध्यक्षांनी केली होती.

मात्र अद्याप यासंदर्भात कोणताही पुढाकार न घेतल्याने उपोषणाला बसावे लागत असल्याचे सुनील सुरडकर यांनी सांगितले. शहीद जवानाच्या स्मारकामुळे तरुणांना देशभक्तीची प्रेरणा मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर स्मारकाचे बांधकाम सुरू करावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.