ग्रामस्‍थांचा आरोप : मंडपगावच्‍या पेयजल योजनेत घपला!; अपूर्ण, निकृष्ठ कामे दाखवली पूर्ण, कोटीची योजना होऊनही गावात पाण्यासाठी भटकंती

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मंडपगाव (ता. देऊळगाव राजा) येथील पेयजल योजनेची कामे अपूर्ण व निकृष्ठ दर्जाची असतानाही पूर्ण दाखवून बिले काढण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे एवढी मोठी योजना होऊनही गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. १ कोटी ७९ लाख ६४ हजार ५३१ रुपयांची कामे या योजनेत मंजूर झाली होती. मात्र योजनेच्या …
 
ग्रामस्‍थांचा आरोप : मंडपगावच्‍या पेयजल योजनेत घपला!; अपूर्ण, निकृष्ठ कामे दाखवली पूर्ण, कोटीची योजना होऊनही गावात पाण्यासाठी भटकंती

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मंडपगाव (ता. देऊळगाव राजा) येथील पेयजल योजनेची कामे अपूर्ण व निकृष्ठ दर्जाची असतानाही पूर्ण दाखवून बिले काढण्यात आल्याचा आरोप ग्रामस्‍थांनी केला आहे. यामुळे एवढी मोठी योजना होऊनही गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. १ कोटी ७९ लाख ६४ हजार ५३१ रुपयांची कामे या योजनेत मंजूर झाली होती. मात्र योजनेच्‍या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या ग्राम आरोग्‍य पोषण, पाणीपुरवठा व स्वच्‍छता समितीच्‍या अध्यक्ष व सचिवांनी पदाचा दुरुपयोग करत लाखो रुपये हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. या योजनेची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कडक करवाई करावी, अशी मागणी प्रहार जनशक्‍ती पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू देशमुख, सचिन कदम, समीर पठाण यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.