कोलाऱ्याच्या शेतकऱ्याने एक शक्‍कल लढवली अन्‌ एकरी ५ क्टिंलच्‍या जागी ७ क्‍विंटल तूर उत्‍पादन वाढले!; आता कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना दिलाय तो सल्ला!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तुरीची पेरणी साधारणत: जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा दरम्यान पूर्ण होते. तुरीचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने तुरीचे शेंडे खुडणे व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. ही शेंडे खुडणी तूर पीक 45 दिवसांचे झाल्यानंतर पहिली खुडणी व 65 दिवसांनंतर दुसरी खुडणी पूर्ण करावी. तुरीचे शेंडे खुडल्याने फांद्यांची संख्या वाढते. तुरीची अनावश्यक वाढ कमी …
 
कोलाऱ्याच्या शेतकऱ्याने एक शक्‍कल लढवली अन्‌ एकरी ५ क्टिंलच्‍या जागी ७ क्‍विंटल तूर उत्‍पादन वाढले!; आता कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना दिलाय तो सल्ला!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तुरीची पेरणी साधारणत: जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा दरम्यान पूर्ण होते. तुरीचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने तुरीचे शेंडे खुडणे व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. ही शेंडे खुडणी तूर पीक 45 दिवसांचे झाल्यानंतर पहिली खुडणी व 65 दिवसांनंतर दुसरी खुडणी पूर्ण करावी. तुरीचे शेंडे खुडल्याने फांद्यांची संख्या वाढते. तुरीची अनावश्यक वाढ कमी होते. तूर जास्त उंच न वाढल्यामुळे औषध फवारणी सुलभ होते. फांद्यांची संख्या वाढल्यामुळे फुलांची व शेंगांची संख्या वाढते. उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते.
तुरीचे शेंडं खुडल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्‍या तुरीचे उत्पादनात वाढ झाली आहे. विजय रामराव सोळंकी (रा. कोलारा, ता. चिखली) यांनीसुद्धा शेंडे खुडल्यामुळे उत्पादनात वाढ झाल्याचा त्यांना अनुभव आहे. शेंडे खुडण्यापूर्वी उत्पादन एकरी 5 क्विंटल होते. परंतु शेंडे खुडणी केल्यामुळे त्यांचे एकरी 7 क्विंटलपर्यंत वाढले. शेतकरी सुनिल सूर्यनारायन कणखर (रा. वरखेड) यांच्या शेतात तुरीचे शेंडे खुडणीमुळे एकरी 11 क्विंटल उत्पादन झाले. हे फायदे विचारात घेता तूर पिकाच्‍या उत्पादनात वाढ करण्यासाठी मोहीम स्वरुपात शेंडे खुडणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.