कोरोना पुन्‍हा वाढतोय… आज ७३ नवे रुग्‍ण!; पिंप्री गवळीच्‍या महिलेचा कोरोनामुळे मृत्‍यू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आता पन्नाशीच्या आतच रुग्णसंख्येचा आकडा येत असल्याने सुटकेचा निःश्वास टाकणाऱ्या आरोग्य यंत्रणेला आणि कोरोना गेल्याच्या अविर्भावात सर्व नियम धाब्यावर बसवणाऱ्या जिल्हावासियांना पुन्हा धडक भरली आहे. दिवसभरात कोरोनाबाधितांचा मोठा आकडा आज, २३ जूनला समोर आला आहे. तब्बल ७३ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, ५४ रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून सुटी मिळाली …
 
कोरोना पुन्‍हा वाढतोय… आज ७३ नवे रुग्‍ण!; पिंप्री गवळीच्‍या महिलेचा कोरोनामुळे मृत्‍यू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आता पन्‍नाशीच्‍या आतच रुग्णसंख्येचा आकडा येत असल्याने सुटकेचा निःश्वास टाकणाऱ्या आरोग्‍य यंत्रणेला आणि कोरोना गेल्याच्‍या अविर्भावात सर्व नियम धाब्‍यावर बसवणाऱ्या जिल्हावासियांना पुन्‍हा धडक भरली आहे. दिवसभरात कोरोनाबाधितांचा मोठा आकडा आज, २३ जूनला समोर आला आहे. तब्‍बल ७३ नव्या पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर पडली असून, ५४ रुग्‍णांना बरे झाल्याने रुग्‍णालयातून सुटी मिळाली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2868 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 2795 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 73 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 58 व रॅपीड टेस्टमधील 15 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 450 तर रॅपिड टेस्टमधील 2345 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 3, बुलडाणा तालुका : रस्ताळा 1, दत्तापूर 2, हतेडी 1, सावंगी 1, शिरपूर 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : नायगाव बुद्रूक 3, पळसखेड 1, नागनगाव 1, पाटोदा 1, धोडप 1, देऊळगाव राजा तालुका : भिवगण 7, सरंबा 2, देऊळगाव मही 1, मेहुणा राजा 1, सिंदखेड राजा तालुका : सायाळा 1, निमगाव वायाळ 1, खामगाव शहर : 6, खामगाव तालुका : सुटाळा बुद्रूक 1, टेंभुर्णा 1, दिवठाणा 1, संग्रामपूर तालुका : चौंढी 2, शेगाव शहर : 2, शेगाव तालुका : चिंचखेड 1, भोनगाव 1, जळगाव जामोद तालुका : धानोरा 4, लोणार तालुका : शिवणी पिसा 1, टिटवी 1, सरस्वती 1, रायगाव 1, तांबोळा 1, अंजनी 1, सुलतानपूर 1, मोप 1, मेहकर शहर : 8, मेहकर तालुका : गणपूर 1, परतापूर 1, मलकापूर शहर :1, मलकापूर तालुका : उमाळी 2 अशाप्रकारे जिल्ह्यात 73 रुग्ण आढळले आहे. उपचारादरम्यान पिंप्री गवळी (ता. मोताळा) येथील 55 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

54 रुग्‍णांना डिस्‍चार्ज
आज 54 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 554891 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85632 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1538 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86406 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 118 कोरोनाबाधित रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 656 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.