कोरोना अपडेट ः आज एकही बाधित नाही; तिघांना डिस्‍चार्ज, सध्या १३ रुग्‍ण घेताहेत उपचार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 17 ऑक्टोबरला कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. दिवसभरात 3 रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 13 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 261 अहवाल प्राप्त झाले आहेत. सर्वच 261 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये …
 
कोरोना अपडेट ः आज एकही बाधित नाही; तिघांना डिस्‍चार्ज, सध्या १३ रुग्‍ण घेताहेत उपचार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 17 ऑक्‍टोबरला कोरोनाचा एकही रुग्‍ण आढळला नाही. दिवसभरात 3 रुग्‍णांना बरे झाल्याने डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. सध्या 13 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 261 अहवाल प्राप्त झाले आहेत. सर्वच 261 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 12 तर रॅपिड टेस्टमधील 249 अहवालांचा समावेश आहे. आजपर्यंत 726501 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86914 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.

आज रोजी 435 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87601 कोरोनाबाधित रुग्ण असून, पैकी 86914 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोविडचे 13 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.