कोरोना ः नव्या १८ पॉझिटिव्ह रुग्‍णांची भर, २७ जण झाले बरे..!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 12 जुलैला कोरोनाचे नव्याने 18 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, 27 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोरोनाचे 83 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 775 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 757 अहवाल कोरोना निगेटिव्ह …
 
कोरोना ः नव्या १८ पॉझिटिव्ह रुग्‍णांची भर, २७ जण झाले बरे..!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 12 जुलैला कोरोनाचे नव्याने 18 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले असून, 27 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोरोनाचे 83 रुग्ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 775 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 757 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 18 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 9 व रॅपीड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 356 तर रॅपिड टेस्टमधील 401 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल
नांदुरा शहर : 3, खामगाव शहर : 1, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 2, जळगाव जामोद तालुका : बोराळा 1, चिखली शहर : 2, चिखली तालुका : बेराळा 1, देऊळगाव राजा शहर : 2, देऊळगाव राजा तालुका : मंडपगाव 1, मेहकर तालुका : चिंचोली 1, बुलडाणा शहर : 1, बुलडाणा तालुका : देऊळघाट 1, लोणार तालुका : टिटवी 2 अशाप्रकारे जिल्ह्यात 18 रुग्ण आढळले आहे.

27 रुग्णांची कोरोनावर मात
आज 27 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 602646 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86386 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1360 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87134 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 83 सक्रीय रुग्ण असून उपचार घेत आहेत. आजपर्यंत 665 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.