कोरोनामुळे दोन महिलांचा मृत्‍यू; नव्‍या 26 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 29 जूनला कोरोनामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला आहे, तर नव्या 26 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. 38 रुग्णांना दिवसभरात बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2751 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 2725 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 26 अहवाल …
 
कोरोनामुळे दोन महिलांचा मृत्‍यू; नव्‍या 26 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 29 जूनला कोरोनामुळे दोन महिलांचा मृत्‍यू झाला आहे, तर नव्या 26 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर पडली आहे. 38 रुग्‍णांना दिवसभरात बरे झाल्याने डिस्‍चार्ज देण्यात आला.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2751 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 2725 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 26 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 15 व रॅपीड टेस्टमधील 11 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 407 तर रॅपिड टेस्टमधील 2318 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
संग्रामपूर तालुका : निवाणा 1, पळशी 1, सोनाळा 1, काकनवाडा 1, खामगाव शहर : 4, खामगाव तालुका : जनुना 1, घाटपुरी 1, सुटाळा 1, देऊळगाव राजा तालुका : भिवगण 1, किन्ही 2, चिखली शहर : 1, चिखली तालुका : मेरा बुद्रूक 1, लोणार तालुका : सावरगाव 1, भुमराळा 1, बिबी 1, पिंप्री खंडारे 1, शेगाव शहर :1, बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : रईखेड टेकाळे 1, जळगाव जामोद तालुका : बोराळा 2 अशाप्रकारे जिल्ह्यात 26 रुग्ण आढळले आहे. उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालय, शेगाव येथे माळीपुरा, शेगाव येथील 75 वर्षीय महिला व स्त्री रुग्‍णालय, बुलडाणा येथे मातला (ता. बुलडाणा) येथील 65 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

38 रुग्‍णांची कोरोनावर मात
आज 38 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 570221 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85879 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1513 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 86638 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयांत 96 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 663 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.