कोरोनाचे नवे ७ रुग्‍ण!; एकाला डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 12 ऑगस्टला कोरोनाचे नवे 7 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत, तर एक रुग्ण बरा झाला आहे. सध्या रुग्णालयांत 67 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1969 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1962 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 7 अहवाल पॉझिटिव्ह …
 
कोरोनाचे नवे ७ रुग्‍ण!; एकाला डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 12 ऑगस्‍टला कोरोनाचे नवे 7 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले आहेत, तर एक रुग्‍ण बरा झाला आहे. सध्या रुग्‍णालयांत 67 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1969 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1962 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 7 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपिड टेस्टमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 452 तर रॅपिड टेस्टमधील 1510 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
चिखली तालुका : करणखेड 1, भालगाव 2, नायगाव 1, शिवणी 1, चिखली शहर : 1, बुलडाणा तालुका : गजरखेड 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 7 रुग्ण आढळले आहेत. तसेच आज 1 रुग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.

आजवर 86612 रुग्‍ण झाले बरे…
आजपर्यंत 660661 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86612 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1793 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87351 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 86612 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोविडचे 67 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.