कडक लॉकडाऊनमध्ये अत्‍यावश्यक कामासाठी जिल्ह्याबाहेर जायचे? अशी काढा ई-पास!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मालवाहतूक व रुग्ण वाहतूक करणाऱ्या वाहनास व शासकीय वाहनासच केवळ बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी वेगळ्या स्वतंत्र परवानगीची गरज नसेल मात्र अत्यावश्यक वेळेस जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे. मालवाहतूक साठा, खतसाठा आदी बाबतीत फक्त लोडिंग व अनलोडिंग करण्यास परवानगी राहील. इतर कारणांकरिता व अत्यावश्यक वैद्यकीय …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः मालवाहतूक व रुग्ण वाहतूक करणाऱ्या वाहनास व शासकीय वाहनासच केवळ बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी वेगळ्या स्वतंत्र परवानगीची गरज नसेल मात्र अत्यावश्यक वेळेस जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे.

मालवाहतूक साठा, खतसाठा आदी बाबतीत फक्त लोडिंग व अनलोडिंग करण्यास परवानगी राहील. इतर कारणांकरिता व अत्यावश्यक वैद्यकीय कारणांकरिता जिल्ह्याबाहेर वाहतूक करावयाची असल्यास https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवरून ई-पास काढून वाहतूक करता येईल. पावसाळ्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने केवळ in-situ पध्दतीने सुरू राहील. पाणीटंचाई तसेच पाणी पुरवठा संबंधित कामे सुरु राहतील. कडक लॉकडाऊनचे आदेश सर्व आस्थापनांना काटेकोरपणे लागू होणार आहेत.