औषध विक्रेत्‍यांना कधी देणार लस?; संघटनेचा सवाल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः औषधविक्रेत्यांना राज्य आणि केंद्र सरकारने अद्याप ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा दिला नाही. त्यांचे अद्याप लसीकरणही सुरू केले नाही. त्यामुळे औषधविक्रेत्यांनी आता ‘आमचे लसीकरण केव्हा,’ असा सवाल उपस्थित केला आहे. राज्यासह देशात दोनशेपेक्षा अधिक औषधविक्रेते कोरोनामुळे मरण पावले. एक हजारांहून अधिक विक्रेते, त्यांचे नातेवाइक बाधित झाले. तरीही सरकारने कोरोनायोद्धा म्हणून सन्मान तर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः औषधविक्रेत्यांना राज्य आणि केंद्र सरकारने अद्याप ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा दिला नाही. त्यांचे अद्याप लसीकरणही सुरू केले नाही. त्यामुळे औषधविक्रेत्यांनी आता ‘आमचे लसीकरण केव्हा,’ असा सवाल उपस्थित केला आहे.

राज्यासह देशात दोनशेपेक्षा अधिक औषधविक्रेते कोरोनामुळे मरण पावले. एक हजारांहून अधिक विक्रेते, त्यांचे नातेवाइक बाधित झाले. तरीही सरकारने कोरोनायोद्धा म्हणून सन्मान तर दिला नाहीच; परंतु साधे लसीकरणात प्राधान्य देण्याचे औदार्यही दाखवले नाही, अशा खंत अखिल भारतीय औषधविक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्‍नाथ शिंदे यांनी लाइव्‍ह ग्रुपकडे व्यक्त केली. संघटनेने वेळोवेळी सरकारकडे पत्रव्यवहार केले आहेत. त्याची दाखल घेतली गेली नाही. सरकारची भूमिका अशीच राहिल्यास व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही श्री. शिंदे यांनी दिला आहे.