असाही देवदूत… आजवर 12 हजारांवर कोरोना रुग्‍णांना वेळीच उपलब्‍ध करून दिले उपचार!; 108 रुग्‍णवाहिकेवरील डॉक्‍टरांची कर्तव्‍यतत्‍परतेची चर्चा

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या काळात माणुसकी हरवल्याचे दिसून येत आहे, पण कर्तव्यतत्पर असणारे अनेक कोरोनायोद्धे स्वतःचा जीव धोक्यात घालून माणुसकी जपत असल्याचे दिसून येत आहे. देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या 108 रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेले डॉ. अक्षय गुठे यांची कर्तव्यतत्परता सध्या चर्चेत आहे. डॉ. गुठे हे कार्यरत असलेल्या रुग्णवाहिकेने वर्षभरात …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्‍हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्‍या काळात माणुसकी हरवल्याचे दिसून येत आहे, पण कर्तव्यतत्‍पर असणारे अनेक कोरोनायोद्धे स्‍वतःचा जीव धोक्‍यात घालून माणुसकी जपत असल्याचे दिसून येत आहे. देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्‍णालयाच्‍या 108 रुग्‍णवाहिकेवर कार्यरत असलेले डॉ. अक्षय गुठे यांची कर्तव्‍यतत्‍परता सध्या चर्चेत आहे. डॉ. गुठे हे कार्यरत असलेल्या रुग्णवाहिकेने वर्षभरात जिल्ह्यातील १२ हजार ६७९ कोरोना रुग्णांना सेवा दिली आहे, हे विशेष.

देऊळगाव राजा तालुक्यातील ९२ अपघात , १६ जखमी, ८८ विषबाधित रुग्णांना तातडीने सेवा उपलब्‍ध करून देण्याचा मानही या रुग्‍णवाहिकेला जातो. देऊळगाव राजा तालुक्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन अलर्ट झाले होते. तो रुग्ण डॉ. अक्षय गुठे यांच्या देखरेखीत बुलडाणा येथे हलविण्यात आला होता. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून डॉ. गुठे हे रुग्णवाहिकेवर चोविस तास सेवा देत आहेत. कोरोना काळात रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळते ही भावना जपत त्‍यांचे कार्य अहोरात्र सुरू आहे.