अंढेरा ग्रामपंचायतीवर गैरव्यवहाराचे आरोप; सरपंचबाईऐवजी दीर गावचे कारभारी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वर्षभरात सेवानिवृत्त होत असलेल्या ग्रामपंचायत लिपिकाला ग्रामसेवक थकीत पगार, राहणी भत्ता, जीपीएफ रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. ग्रामसेवक आडमुठेपणाची व खोडसाळ भूमिका घेत आहे. ग्रामसेवकाने ग्रामपंचायत फंडातून लाखो रुपयांची अनियमितता करून भ्रष्टाचार केला आहे. या बाबत चौकशी होऊन कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी अंढेरा ग्रामपंचायतीचे लिपिक दामोधर अर्जुन सानप काल, …
 
अंढेरा ग्रामपंचायतीवर गैरव्यवहाराचे आरोप; सरपंचबाईऐवजी दीर गावचे कारभारी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वर्षभरात सेवानिवृत्त होत असलेल्या ग्रामपंचायत लिपिकाला ग्रामसेवक थकीत पगार, राहणी भत्ता, जीपीएफ रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. ग्रामसेवक आडमुठेपणाची व खोडसाळ भूमिका घेत आहे. ग्रामसेवकाने ग्रामपंचायत फंडातून लाखो रुपयांची अनियमितता करून भ्रष्टाचार केला आहे. या बाबत चौकशी होऊन कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी अंढेरा ग्रामपंचायतीचे लिपिक दामोधर अर्जुन सानप काल, १२ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

अंढेरा ही देऊळगाव राजा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. २० फेब्रुवारीपासून ग्रामपंचायतीचे हजेरी रजिस्टर ग्रामसेवक स्वतःच्या घरी घेऊन गेले आहेत. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत निवडून आलेल्या महिला सदस्या उपस्थित राहत नाहीत. त्यांच्या पतीच्या सह्या घेऊन ठराव पारित केले जातात. महिला सरपंच असताना त्‍यांचे दीरच ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप करतात. या सर्व प्रकाराला ग्रामसेवक कारणीभूत आहेत, असा आरोप उपोषणकर्ते दामोधर सानप यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मरेपर्यंत उपोषण सुरू राहील, असेही सानप यांनी निवेदनात म्हटले आहे.
ग्रामसेवक म्हणतात…
लिपिकाने केलेले आरोप खोटे आहे. लिपिक ८ महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालयात येत नाहीत. लिपिकाची ग्रामपंचायत कार्यालयाकडे थकलेली पगाराची रक्कम टप्प्याटप्प्याने द्यायला ग्रामपंचायत तयार आहे. – पुरुषोत्तम खेडेकर, ग्रामसेवक, अंढेरा